प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या निर्मिती सावंत यांच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट काय; 'हे' वाचून वाटेल आश्चर्य
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. वर्षानुवर्षे त्या मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं मनोरंजन करत आहेत. आज निर्मिती सावंत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी.
चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निर्मिती सावंत वर्षानुवर्षे मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचं मनोरंजन करत आहेत.
2/ 9
कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, हप्ता बंद, कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. आजही या मालिका सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.
3/ 9
निर्मिती सावंत नुकत्याच झी मराठी वरील फु बाई फु या शोमध्ये जज म्हणून दिसल्या होत्या.
4/ 9
फू बाई फू, जाडूबाई जोरात या विनोदी मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय देखील उत्तम अभिनेता आहे.
5/ 9
अभिनय सावंत आजवर अनेक मालिकांमध्ये झळकला आहे.
6/ 9
एवढंच नाही तर निर्मिती सावंत यांची सूनदेखील एक उत्तम कलाकार आहे.
7/ 9
निर्मिती सावंत यांच्या लेकाने अभिनय सावंतने पूर्वा पंडित हिच्यासोबत लग्न केलं आहे.
8/ 9
पूर्वा एक डुडल आर्टिस्ट आहे. पूर्वाची स्वत:ची एक डुडल कंपनी आहे. त्यामुळे ती स्वत: तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते.
9/ 9
पूर्वाने सासूबाई निर्मिती सावंत यांच्यासोबतही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.