बिग बॉस 6 फेम अभिनेत्री सना खान आजकाल चर्चेत आहे. सना खानने 21 नोव्हेंबर रोजी अचानक गुजरातच्या मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केले. सना खानने सूरतमध्ये मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केले, त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या माध्यमातून लोकांना त्यांच्या लग्नाची बातमी मिळाली. यानंतर सना खानने तिच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आणि फॅन्सना तिच्या लग्नाची माहिती दिली.