

प्रत्येक आठवड्याच्या टीआरपी रेटिंगची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता असते. कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे. याबाबात जाणून घेणं सर्वांना सर्वांना आवडतं. पाहा या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगचे अपडेट्स...


मागच्या आठवड्या प्रमाणं राणादानं नंबर 1 काही सोडला नाही. याही वेळी 'तुझ्यात जीव रंगला' मालिका 1 नंबरवर आहे. प्रेक्षकांचा राणादामध्ये जीव रंगलाय अजून. राणादाचा बदललेला सूर आणि नूर प्रेक्षकांना आवडतोय.


दुसरा नंबर गेल्या वेळचाच आहे. माझ्या नवऱ्याची बायको याही वेळी नंबर 2वरच आहे. कधी काळी सतत नंबर 1 राहणारी ही मालिका, आता तिचं स्थान घसरलंय. कारण फार वेगळं काही पाहायला मिळत नाहीय.


नव्यानं सुरू झालेल्या भागो मोहन प्यारे कॉमेडी-हॉरर मालिकेनं या आठवड्यात चौथं स्थान पटकावलं आहे. ही मालिका मागच्याच आठवड्यात सुरू झाली आहे.


पाचव्या स्थानावर आहे मिसेस मुख्यमंत्री मालिका. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार म्हणत या मिसेस मुख्यमंत्रीनं सगळ्यांची मनं जिंकलीयत. अमृता धोंगडेची सुमी सध्या खूपच चर्चेत आहे. पूर्ण नवीन कलाकारांना घेऊन या मालिकेनं पहिल्या पाचात स्थान मिळवलंय.