टेलिव्हिजनवर पुढील आठवडा ठरणार खास! 'या' चार मालिकांमध्ये नव्या पात्रांची एंट्री
टेलिव्हिजनवर ( Marathi Television) सुरू असलेल्या मालिकांचं कथानक वेळोवेळी बदलत असतं. प्रत्येकवेळी नवा ट्रॅक प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तसंच मालिकेत नवनवीन पात्र देखील येत जात असतात. येणाऱ्या आठवड्यात मराठी टेलिव्हिजनवर चार वेगवेगळ्या मालिकांमध्ये चार नव्या पात्रांची एंट्री होणार आहेत. कोणत्या आहेत त्या मालिका आणि कोण आहेत ती नवी पात्र जाणून घ्या.
|
1/ 9
'आई कुठे काय करते' मालिकेत अभिनेता मयुर खांडगेची रिएंट्री होणार आहे. मयुर संजनाचा नवरा शेखरची भूमिका साकारत आहे.
2/ 9
शेखर मालिकेत आधीपासूनच होता मात्र आता त्याची एंट्री काहीशी खास ठरणार आहे. अनिरुद्ध संजनला त्रास देतो हे त्याला कळल्यानं तो आता अनिरुद्धला धडा शिकवताना आपल्याला मालिकेत दिसणार आहे.
3/ 9
तर कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतही नंदिनी हे पात्र पुन्हा एंट्री घेणार आहे.
4/ 9
नंदिनी म्हणजेच अभिनेत्री अदिती द्रविडनं मालिकेत रिएंट्री मारत शुटींगलाही सुरुवात केली आहे.
5/ 9
नंदिनीच्या येण्यानं अभ्या, नंदिनी आणि लतिका यांची मैत्री पुन्हा बहरताना दिसणार आहे.
6/ 9
स्टार प्रवाहवीरल 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत अभिनेत्री वनिता खरातची एंट्री होणार आहे.
7/ 9
वनीतानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आता ती स्वराबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
8/ 9
तर दुसरीकडे 'फुलला सुगंध मातीचा' या मालिकेतही नव्या पात्राची एंट्री होणार आहे.
9/ 9
'सांग तु आहेस का?' फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.