PHOTO: …असं पार पडलं नेहा आणि रोहनप्रीतचं संगीत; चाहते आता लग्नसोहळ्यासाठी उत्सुक
नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याचे 'संगीत'चे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
|
1/ 5
नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) यांच्या लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाची तयारी चर्चा सुरू आहे. अखेर आज नेहाचं लग्न दणक्यात पार पडणार आहे.
2/ 5
नेहाच्या ‘संगीत’सेरिमनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनीही मस्त डान्स केला. नुकत्याच रीलिज झालेल्या गाण्यावर नेहा ठुमके लगावताना दिसली.
3/ 5
नेहा आणि रोहनप्रीत यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. नेहाने घातलेल्या घागऱ्यामध्ये ती अत्यंत देखणी दिसत होती.
4/ 5
नेहाचे संगीत, मेहंदी आणि हळदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत. नेहा आणि रोहनप्रीतचे चाहते त्यांना इन्स्टाग्रामवरुन शुभेच्छा देत आहेत.
5/ 5
नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला त्यांचं कुटुंब आणि मित्रपरिवार येणार आहेच पण बॉलिवूडमधले अनेक बडे कलाकारही तिच्या लग्नाला हजर होणार आहेत. उर्वशी रौतेला, गोविंदा तिच्या हळदीलादेखील हजर होते.