इंडियन आयडलच्या सेटवर नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या फुललेल्या प्रेमाला आता चांगलाच बहर आलाय. सेटवरच्या ज्या फोटो समोर आल्यात त्यात नेहा बॅचलर पार्टी सेलिब्रेट करताना दिसतीय. तिनं होणाऱ्या नववधूसारखे 'ब्राइड टू बी' चे ग्लासेस लावलेत. यावेळी तिनं हिरव्या रंगाची साडी नेसलीय. आपल्या दिलखेचक आदांनी तिनं सगळ्यांनाच घायाळ केलं आहे.
आदित्य आणि नेहाची केमेस्ट्री सध्या चांगलीच रंगलीय. अनेकांना ही जोडी भावतीय. हे दोघं एकत्र येण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आदित्य आणि नेहानं अत्यंत रोमॅन्टिक अंदाजात डान्स केला. प्रेक्षकांनीही त्यांना तशीच दाद दिली. या कार्यक्रमाचा जो प्रोमो दाखवण्यात आलाय त्यात व्हॅलेंनटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला दोघं लग्नबंधानात अडकणार आहेत असं कळतंय. शोच्या सेटवर तर लगीनघाई दाखवण्यात आलीय पण प्रत्यक्षात असं काही होतं का हे पाहावं लागेल.