Alia Bhatt च्या साडी लुकवर रणबीर नाही तर 'सासुबाई' फिदा, नीतू कपूर यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
Alia Bhatt Photos:आलियाचा हा लुक नेटकऱ्यांना तर पसंत पडतच आहे, शिवाय हा लुक अभिनेत्रीच्या सासुबाईंच्या अर्थातच रणबीर कपूरच्या मम्मीच्यासुद्धा मनात भरला आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आपल्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातून भेटीला येणार आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाची प्रचंड हवा झाली आहे.
2/ 8
दरम्यान आलिया भट्ट दररोज आपल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत विविध साडी लुक शेअर करत आहे. आजही तिचा सुंदर लुक समोर आला आहे.
3/ 8
आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे.
4/ 8
आलियाचा हा लुक नेटकऱ्यांना तर पसंत पडतच आहे, शिवाय हा लुक अभिनेत्रीच्या सासुबाईंच्या अर्थातच रणबीर कपूरच्या मम्मीच्यासुद्धा मनात भरला आहे.
5/ 8
ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह आणि आलिया भट्टच्या होणाऱ्या सासुबाईंनी आलिया भट्टच्या फोटोंवर कमेंट करत 'ब्युटीफुल' असं म्हटलं आहे. सोबतच हार्ट इमोजीदेखील शेअर केला आहे.
6/ 8
यावरुनच आलिया भट्ट आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंमध्ये किती छान बॉन्डिंग आहे हे दिसून येतं.
7/ 8
चाहत्यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. कोरोना महामारीमुळे अनेकवेळा त्यांचं लग्न पुढं ढकलल्याचं म्हटलं जातं.
8/ 8
'गंगूबाई काठियावाडी' सोबतच आलिया भट्ट लवकरच रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' मध्ये झळकणार आहे.