टेलिव्हजन विश्वातील कॉमेडी क्विन भारती सिंहच्या घरावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी छापा टाकला. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) या दोघांवर ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने चौकशीवेळी भारती सिंहचं (Bharti Singh NCB) नाव घेतलं होतं. त्यानंतर एनसीबीने भारती सिंहच्या घरावर रेड (NCB Raid)टाकली. एनसीबीने एकाच वेळी तिच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तीनही घरांवर छापा टाकला आहे. (photo credit: Viral Bhyani)