दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा नुकतीच दिग्दर्शक विघ्नेश शिवन याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. नयनतारा आणि विघ्नेश दोघेही 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर एकमेकांशी विवाह केला. नयनतारा दाक्षिणात्य कलासृष्टीतील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच चर्चेत असते. नयनतारा आणखी एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागचा विषय म्हणजे तिचे व्हायरल होत असेलेले फोटो. नयनतारा आणि विघ्नेशचे हनीमूनचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विघ्नेश आणि नयताराचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे दोघे कधी विवाहबद्ध होतील अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. 9 जून रोजी विवाहबद्ध होत दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.