घटस्फोटाबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडलं मौन; मुलीच्या आठवणीने झाला व्याकूळ
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया (Aaliya) यांच्या घटस्फोटाची (Divorce) केस सध्या कोर्टात सुरू आहे. अनेक महिने गप्प असणाऱ्या नवाजुद्दीनने घटस्फोटाबद्दल मौन सोडलं आहे.


अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Navazuddin Siddiqui)चा आपल्या पत्नीशी घटस्फोट होणार आहे. नवाजुद्दीन आणि आलियामध्ये प्रचंड वाद झाले. त्या दोघांनी एकमेंकांवर बरेच आरोपही केले होते. लवकरच हा अभिनेता आपल्या पत्नीपासून वेगळा होणार आहे. त्याला शोरा आणि यानी अशी दोन मुलंही आहेत.


एका मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीन म्हणाला, “माझ्या पत्नीने माझं नाव बदनाम करण्यासाठी हे सगळे आरोप केले आहेत. मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल फारसं की बोलू इच्छित नाही पण मी माझ्या मुलीवर अतिशय प्रेम करतो. मी जबाबदार वडील आहे. आणि वडील म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करणारच”


नवाजच्या पत्नीने अर्थात आलियाने 6 मे रोजी घटस्फोटासाठी कोर्टात केस फाईल केली. त्यावर नवाजुद्दीनने 15 मे रोजी त्यावर उत्तर दिलं. नवाजुद्दीनच्या वकिलांनी त्याच्या पत्नीवर आरोप केला आहे की, “मीडियामध्ये माझ्या आशिलाचं नाव खराब व्हावं यासाठी आलिया प्रयत्न करत आहे”


आलियाने एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. आलिया म्हणाली होती, “मी माझ्या पहिल्या मुलाच्या वेळी गरोदर असताना नवाजुद्दीन सिद्धीकीचे दुसऱ्या बायकांशी संबंध होते. तसंच लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो तेव्हाही तो इतर स्त्रियांच्या संपर्कात होता.”