'नागिन' फेम अभिनेत्री मोनी रॉयने आपल्या नव्या फोटोशूटने सर्वांना घायाळ केलं आहे. मोनीचे निळ्या रंगाच्या जम्पसूट मधील फोटो सध्या खुपचं व्हायरल होतं आहेत. सतत मोनीचा हॉट लुक चाहत्यांना पहायला मिळत असतो. मोनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 'नागिन' या मालिकेमुळे मोनीला मोठी लोकप्रियता मिळाली होती. मोनी अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर कार्यरत आहे. अलीकडेच मोनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.