छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका म्हणजेचं अभिनेत्री आशका गोराडिया सध्या आपल्या फोटोंमुळे चांगलीच चर्चेत असते. आशकाने पुन्हा एकदा आपले हॉट योगा फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यामध्ये आशका बिकिनीमध्ये हॉट yoga पोझेस देताना दिसून येत आहे. आशकाने अलीकडेच टीव्ही क्षेत्राला रामराम केलं आहे. ती सध्या आपल्या पतीसोबत योगाचे धडे घेत आहे. तसेच आशका एक उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आशकाने आपली नवी इनिंग सुरु केली आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.