हिजाब घालून रॅप करणारी एक मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सानिया मिस्त्री असं या मुंबईकर मुलीचं नाव असून ती फक्त 16 वर्षांची आहे.
2/ 6
मुंबईतल्या गोवंडी शिवाजीनगर भागातील झोडपट्टीमध्ये सानिया राहते. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. तर तिची आई घराला हातभार लावण्यासाठी लहान-मोठी काम करते.
3/ 6
सध्या 12 वीत असलेल्या सानियाच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. या प्रकारचं रॅप साँग रेकॉर्ड करण्यासाठी सुरूवातीला तिच्याकडं मोबाईल देखील नव्हता.
4/ 6
सानियानं मित्र-मैत्रीणींची मदत घेऊन रॅप रेकॉर्ड केलं. आज तिच्या रॅप साँगचे लाखो फॅन्स आहेत.
5/ 6
सानिया लहानपणापासूच कवियत्री आहे. तिला मित्र-मैत्रिणींकडून रॅपबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तिनं रॅप लिहिण्यास सुरूवात केली.
6/ 6
सानियाच्या घरी रॅपबद्दल फारशी माहिती नव्हती. पण व्हिडीओ पब्लिश झाल्यावर आईनं नेहमीच पाठिंबा दिला. आता लोकांचाही तिच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं सानिया सांगते.