PHOTOS : 'मिसेस मुख्यमंत्रीं'चा हा अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल
मिसेस मुख्यमंत्रींचा हा नवा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
|
1/ 9
झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. त्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतं. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
2/ 9
सुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
3/ 9
मालिकेत सध्या गावरान मुलीची भूमिका साकारणारी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे रिअल लाइफमध्ये मात्र खूपच मॉडर्न आहे. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
4/ 9
तिच्या सोशल मीडियावर ती अनेक कॅज्युअल आऊटफिटमध्ये फोटोज पोस्ट करत असते. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
5/ 9
कॅज्युअल आऊटफिट, शूज आणि कमीत कमी मेकअपमध्येसुद्धा अमृताचं सौंदर्य तितकंच खुलून येतं. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
6/ 9
सुमी म्हणजेच अमृता खऱ्या आयुष्यात देखील तितकीच खट्याळ आणि मनमोकळ्या स्वभावाची आहे आणि ऑफस्क्रीनसुद्धा ती तितकीच सेटवर धमाल करते. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
7/ 9
सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. पण सोशल मीडियावरही अमृता तिच्या स्टाइलस्टेटमेंटने सुद्धा प्रेक्षक आणि चाहत्यांना इम्प्रेस करतेय. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
8/ 9
ऑनस्क्रीन दिसणारी सुमी आणि ऑफस्क्रीन कॅज्युअल अवतारमध्ये दिसणारी अमृता या दोघीनींही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)
9/ 9
मिसेस मुख्यमंत्रींच्या या कॅज्युअल अवतारावर देखील चाहते फिदा झाले आहेत. (फोटो- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)