छोट्या पडद्यावरील नागिन बनून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट अंदाजासाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके फोटो. बिकीनीत मौनी अतिशय सुंदर दिसत आहे. बोल्ड आणि ब्युटीफूल अशी मौनीची ओळख आहे. छोट्या पडद्यावर मोठं नाव कमावणारी मौनी सध्या बॉलिवूडमध्येही नाव आजमावत आहे. नागिन या मालिकेनंतर मौनीला मोठी ओळख मिळाली होती. बिग बॉस, नचबलिये या शोमध्येही ती दिसली होती. २००४ साली मौनी रण या चित्रपटात झळकली होती. मौनी सध्या बॉलिवूडमध्ये फारच सक्रिय आहे. लवकरच ती ब्रम्हास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. ती मेड इन चायना आणि केजीएप चॅप्टर १ या चित्रपटांत ती झळकली होती. सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे हटके फोटो शेअर करत असते. तिचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडतो.