छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ट्रॅडिशनल ते वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसते. नुकताच मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिचा वेस्टर्न लूक दिसून येत आहे. यामध्ये मौनी ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मौनी आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच वेड लावत आहे. मौनी अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. मात्र नागिन या मालिकेने मौनीला नवी ओळख दिली आहे. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले हॉट अँड बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. तिच्या प्रत्येक फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. मात्र तिला छोट्या पडद्या इतकं यश येथे मिळू शकलं नाही. दरम्यान सतत मौनी रॉयच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.