बॉलिवूडमध्येही भाऊ-बहिणींच्या प्रसिद्ध जोड्या आहेत, जे एकमेकांवर फार प्रेम करताना दिसतात. पाहा कोण आहेत. रणबीर कपूर आणि रिद्धीमा कपूर ही जोडी देखील फार प्रसिद्ध आहे. अनेकदा ते एकत्र दिसतात. सारा अली खान आणि इब्राहीम अली खान दोघेही बहीण भाऊ नेहमीच निरनिराळ्या ट्रिप्सवर एकत्र दिसतात. तैमूर अली खान आणि जहाँगीर म्हणजेच लहानगा जेह ही नवी जोडी देखील हीट ठरत आहे. काही महिन्यापुर्वीच जेहचा जन्म झाला आहे. सैफ अली खान आणि सोहा अली खान ही जोडी तर हीट आहेच. याशिवाय सबा अली खान देखील त्यांची लाडकी बहीण आहे, जी लाइमलाइटपासून दूर आहे. सोनम कपूर आणि रिया कपूर एकमेकींवर फार प्रेम करतात. नुकतच रियाचं लग्न झालं आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या बहिणीही एकमेकींवर खूप प्रेम करताना दिसतात. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या बहिणींची जोडी बॉलिवूडमध्ये हिट ठरत आहे.