अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. मिलिंदने त्याचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिलिंदने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आजही मिलिंदचा फिटनेस हा पूर्वीसारखाच आहे हे लक्षात येतं. मॉडेलिंग काळात मिलिंदला काही कॉन्ट्रोव्हर्सिजला सामोर जावं लागलं होतं. मॉडेलिंग व्यतिरिक्त मिलिंद एक अभिनेता आहे. अनेक चित्रपटांमधून तो दिसला होता. ऐकेकाळी मिलिंदने लांब केस ठेवले होते. मॉडेल मधू सापरे सोबत न्युड फोटोशुट केल्याने काही वर्षापूर्वी मिलिंद ला कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. मॉडेलिंग व्यतिरिक्त मिलिंद एक धावपटू, स्विमर, अभिनेता आणि टिव्ही निवेदक देखिल आहे. अंकिता कोनवार सोबत केलेल्या विवाहामुळे मिलिंद फात चर्चेत असतो. मिलिंद हा आंतरराष्ट्रीय पातळीचा स्विमर देखिल राहीलेला आहे. मिलिंदचा फिटनेस आजही तरुणांना प्रेरणा देतो. अनेकजन त्याच्या फिटनेसचे चाहते आहेत.