Miss World 2021: 'या' सौंदर्यवतींसोबत भिडणार मानसा वाराणसी, पाहा PHOTO
मिस वर्ल्ड 2021 साठी अनेक प्रबळ दावेदार आहेत. जे भारतीय स्पर्धक मानसा वाराणसीला कठीण स्पर्धा देत आहेत. या सर्व स्पर्धकांनी आपापल्या देशातील सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. चला तर जाणून घेऊया या सुंदरींबद्दल ज्यांनी मिस वर्ल्ड 2021 मध्ये आपली चमक दाखवली आहे.
मानसा वाराणसीने फेमिना मिस इंडिया 2020 चा 'किताब जिंकला आहे. मिस वर्ल्ड २०२१ साठी ती एक प्रबळ दावेदार आहे. सर्व काही ठीक राहिल्यास ती हे विजेतेपद जिंकून भारतात परतेल.
3/ 8
श्री सैनी ही भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असून तिनं मिस अमेरिकाचा किताब पटकावला आहे.
4/ 8
खदिजा उमर मिस सोमालिया आहे. मेकअप आर्टिस्ट असण्यासोबतच ती सायकॉलॉजीचा अभ्यास करत आहे. तिला जगभरातील हिजाबी महिलांचे प्रतिनिधित्व करायचे आहे.
5/ 8
एलेजांद्रा कोंडे मिस व्हेनेझुएला झाली आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांनी अनेक वेळा मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे.
6/ 8
मारिया फरहाद मिस इराक झाली आहे. तिला अभिनेत्री व्हायचं आहे. तिनं कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलं आहे.
7/ 8
ट्रेसी पेरेझ मिस फिलिपाईन्स झाली आहे. मिस वर्ल्ड २०२१ साठी ती प्रबळ दावेदार मानली जात आहे.
8/ 8
अमानी लियोनी मिस ट्युनिशिया झाली आहे.ती तायक्वांदो खेळाडूही आहे. जर तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तर हा किताब जिंकणारी ती पहिली ट्युनिशियाची महिला असेल.