Happy Birthday Dia Mirza: रहना हैं तेरे दिल में म्हणत आजही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान कायम
दिया मिर्झाने 2000 मध्ये जिंकला होता मिस एशिया पॅसेफिक हा बहुमान, पहिल्याच चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. आज बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा वाढदिवस एक नजर टाकूया तिच्या कारकीर्दीवर.


Happy Birthday Dia Mirza: दिया मिर्झा (Dia Mirza) 2000 मध्ये झालेल्या मिस इंडिया (Miss India) स्पर्धेत रनरअप होती पण त्याच वर्षी दिया मिर्झाने मिस एशिया पॅसेफिक (Miss Asia Pacefic) ही स्पर्धा जिंकत यशही मिळवलं होतं. मिस एशिया पॅसेफिक जिंकल्यानंतर दियाने हिंदी चित्रपटांत पदार्पण केलं. 'रहना है तेरे दिल में' हा तिचा पहिला चित्रपट.


चाहत्यांच्या मनांवर राज्य करणारी देखणी अभिनेत्री दिया मिर्झा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. दिया मिर्झाचा जन्म 9 डिसेंबर 1981ला झाला. (फोटो: दिया मिर्झाच्या इंस्टाग्रामवरून)


दिया मिर्झा 2000 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत रनरअप राहिली पण 2000 मध्येच तिनी मोठं यश मिळवलं. दियाने 2000 मध्ये मिस एशिया पॅसेफिक ही स्पर्धा जिंकली होती.


मिस एशिया पॅसेफिक स्पर्धा जिंकल्यानंतर दियाने हिंदी चित्रपटांत पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट 'रहना है तेरे दिल में'.


मोठ्या पडद्यावर या चित्रपटाला फार यश मिळालं नव्हतं पण तरुणाईला चित्रपट इतका आवडला होता की आर. माधवन आणि दिया यांच्या जोडीची तुलना टायटॅनिक चित्रपटातील केट विन्स्लेट आणि लिओनार्डो डीकॅप्रिको या जोडीशी झाली होती.


दियानी 2001 मध्ये दीवानापन चित्रपटात अर्जुन रामपालसोबत तर 2002 मध्ये तुमको ना भूल पाएँगे चित्रपटात सलमान खानसोबत काम केलं आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या दियाच्या दम चित्रपटात तिच्या कामाचं कौतुक झालं. यात तिच्यासोबत विवेक ओबेरॉय हिरो होता. 2005 मध्ये आलेल्या दस चित्रपटात दियाने संजय दत्त, जायेद खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं.


2020 मध्ये दिया थप्पड या चित्रपटात दिसली. घरगुती हिंसाचार आणि महिलांचा स्वाभिमान या विषयावर हा चित्रपट आधारित होता. यात तापसी पन्नूने मुख्य भूमिका केली होती.


दियानी 2019 मध्ये झी-5 ओटीटी फ्लॅटफॉर्मवर आलेल्या काफीर या वेबसीरीजमध्ये काम केलं होतं. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. या भूमिकेसाठी दियाला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2020 हा पुरस्कारही मिळाला.