Amazon Prime Videos वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर सीझन 2 चा सर्वत्र बोलबाला आहे. शेकडो मीम्स दिवसाला शेअर होतायंत, कलाकाराचं कौतुक करताना प्रेक्षक थकत नाही आहेत. यातील प्रत्येक पात्राता सीझन 2 मध्ये ट्वीस्ट पाहायला मिळतो आहे. गोलू, गुड्डू, मुन्ना भैया, कालीन भैया, बिना त्रिपाठी, बाबुजीपासून ते अगदी त्रिपाठींची मोलकरीण 'राधा' या सीझनमध्ये काहीतरी कमाल काम करत आहेत. राधाने या कहाणीत काय ट्वीस्ट आणला ते तुम्हाला सीरिज पाहिल्यावर कळेल. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत राधा खऱ्या आयुष्यात कशी आहे. (फोटो सौजन्य- instagram/@prashansasharma212)