

मिर्झापूर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये म्हणजेच मिर्झापूर-2(Mirzapur 2) मध्ये मुन्ना भैय्याच्या पत्नीची म्हणजेच सीएम माधुरी भाभीची (Isha Talwar Mirzapur) भूमिका करणारी ईशा तलवार(Isha Talwar) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. तिचं मोठं फॅन फॉलोईंग देखील आहे. आपल्या चाहत्यांसाठी ही अभिनेत्री अनेक फोटो अपलोड करत असते. मिर्झापूर-2 मध्ये तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या वेब सिरीजमध्ये नेहमीच साडीत दिसणारी ईशा रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिने अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit: instagram/@talwarisha)


ईशाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकापेक्षा एक असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या ब्लॅक मोनोकिनीमधील लुकमध्ये ईशा खूप स्टनिंग दिसत आहे (Photo Credit: instagram/@talwarisha)


या फोटोमध्ये ईशाने बििकिनी आणि त्यावर पांढरा सनकोट घालून पोज दिली आहे. यातील काही फोटोंमध्ये ईशा समुद्रकिनारी तर काही फोटोंमध्ये स्विमिंग पुलमध्ये बोल्ड पोज देत आहे.(Photo Credit: instagram/@talwarisha)


तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ईशाचा पांढऱ्या शर्टमधील हा बोल्ड फोटो खूपच व्हायरल झाला होता. (Photo Credit: instagram/@talwarisha)


मिर्झापूरमध्ये ईशाने साकारलेली माधुरीची भूमिका तिच्या या बोल्ड फोटोंपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. माधुरीच्या भूमिकेत गोड अन् राजकारणी लुक तिला खुलून दिसतोय. तर खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे. मिर्झापूर2 नंतर सोशल मीडियावर तिचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. अनेक नेटिझन्सनी तिच्या या भूमिकेनंतर तिला 'नॅशनल क्रश' म्हणून देखील जाहीर केलं होतं. (Photo Credit: instagram/@talwarisha)