

मिलिंद आणि अंकिता 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांच्या वयातल्या अंतरामुळे दोघांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं होतं. दोघांवर सातत्याने सोशल मीडियामार्फत टीकाही झाली. पण दोघांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.


स्विमिंग पूलमध्ये इंटेन्स लुकमधला मिलिंदचा हा फोटो त्याच्या सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक आहे असं त्याचे चाहते मानतात. काही दिवसांपूर्वीच मिलिंदनं हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. फिटनेस फ्रिक मिलिंदला प्रवासाची प्रचंड आवड असून पत्नीसोबत तो अनेकदा हॉलिडे एन्जॉय करताना दिसतो. तेव्हाचे त्याचे फोटो अनेकदा व्हायरलही होतात.


फिटनेस आयकॉन मिलिंदचे पत्नीसोबतचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात मिलिंद आणि अंकिता स्विमिंग पूलमध्ये फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. काहीशा बोल्ड अंदाजातील या फोटोंमध्ये मिलिंद आणि अंकिता एकदम परफेक्ट कपल दिसत आहेत.


हा फोटो मिलिंदची पत्नी अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून तिचा हा बिकिनी लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. अंकितासुद्धा मिलिंद प्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे.


मिलिंद सोमण आणि अंकिता नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. मिलिंद-अंकिताचे अशा प्रकारे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होणं ही पहिलीच वेळ नाही. आधीही या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.