'वय नव्हे, योग्य व्यक्ती पाहून लग्न करा', 26 वर्षांचं अंतर असलेले मिलिंद-अंकिता देतायत Couple Goals
मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचं जमलं 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केलं तेव्हा केवढा तरी गहजब उडाला होता. पण आता वयात एवढं अंतर असलेली जोडी हिट झालीये. त्यांनी काय कपल गोल्स दिलेत पाहा...
|
1/ 10
मिलिंद सोमण हा एक भारतीय सुपरमॉडेल, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि फिटनेस प्रमोटर आहे. 55 व्या वर्षातही तो हिट आणि हॉट दिसतो म्हणून तरुणी फिदा असतात.
2/ 10
अंकिता कुंवरही कॅबिन क्रू मेंबर त्याच्या प्रेमात पडली. आपल्याहून 26 वर्षांनी लहान अंकिताशी मिलिंदने लग्नही केलं.
3/ 10
या वयात मिलिंदने लग्न केलं आणि तेही निम्म्या वयाच्या मुलीशी, तेव्हा या लग्नाची खूपच चर्चा झाली आणि किती दिवस रिलेशनशिप टिकणार असंही बोललं गेलं.
4/ 10
अंकिता आणि मिलिंद सोशल मीडियावरून त्यांच्या पर्सनल लाइफचेही फोटो अपडेट करत असतात. वय बघून नव्हे, व्यक्ती पाहून लग्न करा, असं मिलिंद आता सांगतो.
5/ 10
अंकिता आणि मिलिंदची भेट एका हॉटेलमध्ये झाली होती.
6/ 10
मिलिंदने जाहीरपणे हे कबूल केलं आहे की, पहिल्याच भेटीत तो अंकिताकडे ओढला गेला होता.
7/ 10
मिलिंदच्या आधी सुद्धा अंकिता रिलेशनशिप मध्ये होती. पण तिच्या बॉयफ्रेंडचा आकस्मिक मृत्यू झाला होता.
8/ 10
अंकिता कशीबशी पुन्हा आपलं जीवन पूर्वपदावर आणत होती आणि तेव्हाच तिची मिलिंदशी ओळख झाली.
9/ 10
अंकिता आणि मिलिंद याचं नातं जेव्हा जगजाहीर झालं तेव्हा ती एक ब्रेकिंग न्यूज झाली आणि गहजब उडाला.
10/ 10
अनेकांनी त्यांच्यावर टीका केली, Memes बनवले, जोक्स तयार केले. पण दोघांनी कधीही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही.