बॉलिवूड गायक मिका सिंहचा 'मिका दी वोटी' हा रिऍलिटी शो प्रचंड चर्चेत आला होता. अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा पुरीने हा शो जिंकल्याचं म्हटलं जात आहे. आहे. त्यामुळे आता लवकरच आकांक्षा मिका सिंहची पत्नी बनणार असल्याचं म्हटलं जात आहे. आकांक्षा आणि मिका हे गेल्या चौदा वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. आकांक्षा पुरीने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. आपल्या मित्राला एका पत्नीमध्ये हव्या असलेल्या सर्व कॉलीटी आपल्यात असल्याने आपण या शोमध्ये सहभागी झाल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं. आकांक्षा पुरीने यापूर्वी 'बिग बॉस 13' चा स्पर्धक आणि अभिनेता पारस छाब्राला डेट केलं होतं. आकांक्षाने बिग बॉसमध्ये येत पारसबाबत अनेक खुलासे केले होते.