'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर धडाक्यात साजरा झाला या दोन कलाकारांचा वाढदिवस; पाहा Photos
स्टार प्रवाहवर 'मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा' या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत.
मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या कार्यक्रमात कॅप्टन कृती महेश आणि वैभव घुगेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
2/ 5
या प्रसंगी वैभव घुगेने आपल्या जबरदस्त शैलीत नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
3/ 5
या कार्यक्रमाचा सुपरजज अंकुश चौधरी आणि संपूर्ण टीमने कृती आणि वैभवला मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण स्टेजवर धमाल आणि मस्ती करताना सगळेच दिसत होते. त्यामुळं हा कार्यक्रम फार रंगतदार ठरत आहे.
4/ 5
स्पर्धकांच्या जबरदस्त परफॉर्मन्स सोबत जजेसमधील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळं अल्पावधीतच हा शो चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.
5/ 5
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रचंड गाजत आहे कारण त्यात एकापेक्षा एका वरचढ अशा कलाकारांनी भाग घेतला आहे.