मुंबईः कन्नड़ चित्रपटातील अभिनेता चिरंजीवी सर्जा (Chiranjeevi Sarja) याचं 7 जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चिरंजीवीला शनिवारी 6 जून रोजी दम लागणे आणि छातीत दुखत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं. जेव्हा चिरंजीवीचं निधन (Chiranjeevi Sarja Death) झालं होतं तेव्हा त्याची पत्नी मेघना राज (Meghna Raj)गर्भवती होती. मेघना त्यादरम्यान 3 महिन्यांची गर्भवती होती. अशात चिरंजीवीच्या निधनामुळे तिला मोठा धक्का बसला होता. मात्र गर्भातील बाळासाठी तिने खंबीरपणे याला तोंड दिलं. (photo credit: instagram/@megsraj)