प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. प्रार्थना बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे (Bold & hot photoshoot) सतत चर्चेत असते. प्रार्थनानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. प्रार्थनानं गोल्डन ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं असून यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. प्रार्थनाने 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असं कॅप्शन देत हे फोटोशूट शेअर केलं आहे प्रार्थनाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. प्रार्थना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्याना हा लूक फारच आवडला आहे प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेवर आणि मालिकेवर प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसतात. प्रार्थनानं आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर वेगळा असा चाहता वर्ग बनवला आहे.