बालकलाकार मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच परी अर्थातच मायराच्या अकाऊंटवर काही क्युट फोटो शेअर करण्यात आले आहेत. मायराने अतिशय गोड असं फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये वेस्टर्न लुकमध्ये मायरा फारच गोंडस दिसत आहे. 'माझी तुझी रेशीगाठ' या मालिकेमुळे मायरा घराघरात पोहोचली आहे. मालिकेत मायराने क्युट परीची भूमिका साकारली आहे. मायराला मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. शिवाय ती सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या मायाराची आई तिचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळते.