अभिनेता श्रेयस तळपदे त्याच्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जातो. तसेच त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. श्रेयस तळपदेची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तो नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. त्यावरून तो विविध फोटो शेअर करत असतो. श्रेयस त्या फोटोंना भन्नाट असे कॅप्शन देऊन चाहत्यांना आकर्षित करत असतो. नुकतंच अशाच एका भन्नाट कॅप्शनसह श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये श्रेयस बाथटबमध्ये बसलेला दिसत आहे. फोटोला कॅप्शन देत त्याने मुंबईच्या पावसाबाबत लिहिलं आहे. या फोटोंमध्ये श्रेयस बाथटबमधील पाण्यात भिजला आहे. परंतु त्यामुळे त्याला मुंबईच्या पावसामध्ये भिजल्याचा आनंद असल्याचं श्रेयस म्हणतोय. त्याचबरोबर मुंबईचं सौंदर्य पावसाळ्यात वेगळंच भासतं असंही श्रेयस म्हणतोय. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. अभिनेता श्रेयस तळपदे सध्या झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम करत आहे.