'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली आहे. मृणमयी देशपांडेची बहीण असूनसुद्धा तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेताना दिसून येत आहे. गौतमीने फोटो शेअर करत सुंदर कवितेच्या ओळीसुद्धा लिहल्या आहेत. अभिनेत्रीने कवी संदीप खरे यांच्या ओळी लिहत म्हटलंय, ''पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा...कधी उधाणता अन केव्हाथेंबांच्या संथ लयीचा ...'' गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत व्हिडीओ फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री सध्या पडद्यापासून दूर असली तरी चाहते तिच्यावर प्रचंड प्रेम करतात. 'माझा होशील ना' मालिकेत गौतमीने सईची भूमिका साकारली होती.