'माझा होशील ना' फेम सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आपल्या बोल्ड लुकने सर्वांनाचं घायाळ करत आहे. सईने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यामध्ये ती अगदी बोल्ड अंदाजात दिसत आहे. फोटो पाहून चाहते भरभरून लाईक्स करत आहेत. गौतमी सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपले नवनवीन लुकमध्ये फोटोशूट करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम करत असतात. गौतमीने खूपच कमी काळात ही लोकप्रियता मिळवली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेमुळे ती सईच्या रुपात घराघरात पोहोचली आहे. गौतमी पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लुकमध्ये तितकीच खुलून दिसते. अभिनेत्रीसोबतचं गौतमी एक उत्तम गायिका सुद्धा आहे. ती सतत सोशल मीडियावर आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करत असते. गौतमी दिसायला जितकी सुंदर आहे तितकाच सुंदर तिचा अभिनयसुद्धा आहे.