'हाच माझा सोबती...' गौतमी देशपांडेने सांगितलं तिच्या 'या' खास सोबत्याबद्दल, पहा PHOTO
‘माझा होशील ना’ मालिकेची सई म्हणजेच गौतमी देशपांडे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टीव्ह असते. मूळची इंजिनियर असलेली गौतमी एक उत्तम गायिकाही आहे. lokmat.News18.com ला मुलाखतीत तिने अनेक गुपितं उघड केली आहेत.
गौतमीने सांगितलं ‘मला सईचा बिनधास्तपणा आवडतो. कारण सई खूप खरी आहे. आपण म्हणतो ना, काही गोष्टी पोटातून वाटल्या की कराव्यात. ती तसं करते. मला हे आवडतं'. (सौजन्य - instagram)
2/ 6
गौतमीला पाऊस खूप आवडतो. ती म्हणते, ‘गेल्या जन्मी मी मोर असेन. कारण पाऊस आला की माझा मूडच चांगला होतो. मला पाऊस प्रचंड आवडतो. मी बराच वेळ खिडकीतून पाऊस बघत बसते. पाऊस माझा सोबती आहे.’ (सौजन्य - instagram)
3/ 6
तिने सांगितलं 'सई पटकन विचार न करता एखादा निर्णय घेऊन टाकते. त्याचे परिणाम काय हे न बघता, ती मनाला वाटेल ते करून टाकते. त्यामुळे तिच्या अंगाशीही आलंय अनेकदा. पुढेही येणार आहे. तिच्या या गोष्टी मला अनेकदा खटकतात’. (सौजन्य - instagram)
4/ 6
गौतमी म्हणते, 'अनेक गोष्टीत मी आणि सई सारख्या आहोत. महत्त्वाचे म्हणजे सईचा खरेपणा माझ्यात आहे. मी खोटी नाही आणि मला खोटेपणा करणारी माणसंही आवडत नाहीत'. (सौजन्य - instagram)
5/ 6
गौतमीला जेव्हा तिच्या गायना बद्दल विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली ‘मी आधी खरं तर गायचेच. मी पुण्यात शो करत होते. शिवाय मी नोकरीही करत होते. त्यामुळे मी असं नाही म्हणत की एखादी गोष्ट करियर असते, एखादी छंद. असं काही नसतं. आपण सगळंच करत असतो.’ (सौजन्य - instagram)
6/ 6
ती म्हणते 'आपलं एकच आयुष्य असतं. त्यात देवाने तुम्हाला जे जे दिलंय, याचा पुरेपुर उपयोग करून घेणं, त्यात आनंद घेणं माझ्यासाठी करियर करण्यापेक्षा महत्त्वाचं आहे.’ (सौजन्य - instagram)