माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकुळ सोशल मीडियावर सक्रीय असते. मायराचं युट्यूब चॅनेलही आहे. जे तिचे आई बाबा हँडल करत असतात. मायराचे क्यूट व्लॉग्स त्यावर पाहायला मिळतात. मायराच्या प्रवासात तिच्या आई वडिलांची खूप मेहनत आहेत. मायराची आई देखील तिच्याइतकीच सुंदर आणि स्टायलिश आहे. स्टायलिंग आणि फोटो पोझेसमध्ये दोघी एकमेकींना टक्कर देत असतात. मायरा एक नंबरी असली तरी तिची आई मात्र दसनंबरी आहे. स्पेशल प्रोग्रामसाठी मायरा आणि तिची आई श्वेता वायकुळ ट्विनिंग स्टाइलमध्ये दिसतात. दोघींचे फक्त आऊटफिट्सच नाही तर फोटो पोझेसही हटके असतात. श्वेता आणि मायरा या क्यूट मायलेकीची जोडी आणि त्याच्या पोझेस, आऊटफिट्सना सोशल मीडियावर पसंती मिळत असते.