ग्लॅमरस सना खानने कलाक्षेत्र सोडल्यानंतर नवऱ्याची पहिलीच प्रतिक्रिया; नोव्हेंबरमध्ये झाला होता 'निकाह'
20 नोव्हेंबर रोजी एका खाजगी कार्यक्रमात सना खान (Sana Khan) हिने अनस सय्यदशी (Anas Saiyad) लग्न केलं. सोशल मीडियावर त्यानंतर तिने काही फोटो पोस्ट केले होते


सना खानने (Sana Khan) बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर लग्न करणं सर्वांसाठी शॉकिंग होतं. तिने नोव्हेंबर 2020 मध्ये व्यावसायिक आणि मौलाना मुफ्ती अनस सईद यांच्याशी लग्न केलं (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)


20 नोव्हेंबर रोजी एका खाजगी कार्यक्रमात अनस सय्यदशी लग्न केलं. सोशल मीडियावर त्यानंतर तिने काही फोटो पोस्ट केले होते (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)


सना खान (Sana Khan) चा 'शौहर' अनस सैयद (Anas Saiyad) याने अलीकडेच ईटाइम्स बरोबर केलेल्या संभाषणात असं म्हटलं आहे की, 'लोकं असा विचार करण्यात स्वतंत्र आहेत की आमची जोडी एकमेकांना शोभणारी नाही आहे. पण मी प्रार्थना केली होती की माझी सनाशी लग्न करण्याची इच्छा आहे आणि त्याने माझी प्रार्थना ऐकली. मला असं वाटतंय की जर माझा इतर कुणाशी विवाह झाला असता तर मी इतका आनंदी झालो नसतो.' (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)


सना खान बद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलं की, ती मनमिळावू आणि मनाची चांगली आहे. लोकं अजूनही विचार करतात की मी एका अभिनेत्रीशी लग्न कसं काय केलं, पण हा त्यांची ही विचारसरणी फार छोटी आहे. अनसनी यांनी असं म्हटलं आहे की हे माझं आयुष्य आहे, लोकांनी यावर कमेंट नाही केली पाहिजे (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)


अनस यांनी म्हटलं आहे की ते दोघेही एकमेकांसाठी अनुकूल आहेत (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)


सनाने मनोरंजन विश्व सोडण्याबाबत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'मी कधी तिच्यावर याबाबतीत दबाव टाकला नाही. तिने लग्नाच्या खूप आधी याबाबत घोषणा केली होती की ती हिजाब परिधान करणार आहे. तेव्हा लोकांनी असा विचार केला की ती कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिच्याकडे काही काम नाही आहे. या परिस्थितीत मी तिला वेळ देऊ इच्छित होतो. पण तिचा निश्चय पक्का होता.' (फोटो सौजन्य- instagram/@sanakhaan21)