

सहा वर्ष रिलेशनमध्ये असलेले दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीरपणे लग्नाची घोषणा केल्यानंतर 14, 15 नोव्हेंबरला ते लग्न बंधनात अडकणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे ठिकाण निश्चित झाले असून ते दोघे इटलीमध्ये लग्न करणार आहेत


लग्नाला काही दिवस बाकी असताना लग्नात सुंदर दिसण्यासाठी दीपिका सध्या सलॉनला भेट देत आहे. दीपिका एका स्पा सलॉनमध्ये जात असल्याची माहिती मिळाली आहे.


त्याचबरोबर लग्नातील दीपिकाचा ड्रेस हा सब्यसाची मुखर्जी डिझाईन करणार आहेत. सब्यसाची नावाने हा एक ड्रेसचा प्रकार आहे. अनुष्का शर्माने तिच्या लग्नातील ड्रेस सब्यसाची कडून डिजाईन केला होता.


लग्नाचा शेवट त्यांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार यांच्यासोबत होणार आहे. लग्नानंतर लगेचच रणवीर आणि दीपिका हनीमूनला जाणार आहेत. तेथून आल्यावर रणवीर त्याच्या सिंबा चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त होईल.


सध्या दीपिका आणि रणवीरचं लग्न टाॅक आॅफ द टाऊन आहे. दोघांचे फॅन्स खूप आहेत. त्यामुळे त्यांना लग्नाची सर्व बित्तंबातमी हवी असते. आता लग्न इटलीत होणार हे तर कळलंय. पण रिसेप्शन कुठे हेही समोर आलंय.


फिल्मी माॅन्कीनुसार दोघांचं रिसेप्शन होणार आहे 1 डिसेंबरला. म्हणजे प्रियांकाच्या लग्नाच्या एक दिवस आधी.


रिसेप्शनला जवळजवळ 3 हजार लोक असतील असा अंदाज आहे. अख्खं बाॅलिवूड या सोहळ्याला उपस्थित असणार आहे.


हे रिसेप्शन होणार आहे मुंबईच्या गँड हयात हाॅटेलमध्ये. त्याआधी बंगळुरूमध्येही 28 आणि 29 नोव्हेंबरला खास कार्यक्रम असेल, असं मिस मालिनीमध्ये छापून आलंय.