राणा-अंजली पुन्हा एकत्र! PHOTO पाहून वाढली चाहत्यांची धकधक
मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधून राणा आणि अंजलीची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
|
1/ 7
मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधून राणा आणि अंजलीची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
2/ 7
साधाभोळा ग्रामीण राणा आणि हुशार समजूतदार शहरी अंजली या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ पाडून गेली होती. चाहत्यांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.
3/ 7
मात्र काही महिन्यांपूर्वी या मालिकेने आपला निरोप घेतला आहे. मालिका बंद झाल्यामुळे चाहते खूपच दुखी झाले होते. मालिका बंद झाल्यानंतरही या जोडीची क्रेझ कायम आहे.
4/ 7
नुकताच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी म्हणजेच आपल्या राणा आणि अंजलीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये दोघेही पुन्हा एकत्र आल्याचं दिसत आहे.
5/ 7
अंजली आणि राणा एका फोटोशूटच्या निमित्ताने एकत्र आले होते. यामध्ये दोघांनी पारंपारिक आणि वेस्टर्न कॉम्बो लुक केला होता.
6/ 7
दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते जाम खुश झाले आहेत. या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
7/ 7
तुझ्यात जीव रंगला या मालिकेने चाहत्यांना चांगलीचं भुरळ घातली होती. या मालिकेतील वाहिनीसाहेब, गोदा आक्का ते बरकत अशा सर्वचं भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.