Pune: 'झी'च्या नव्या मालिकेचं शूटिंग पुण्यात; मुंबईबाहेर चालल्या मराठी मालिका
पूर्वी मराठी मालिकांचं चित्रीकरण हे फिल्मसिटीमध्ये होताना दिसत होते. मात्र आता मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध शहरात होताना दिसते. तुमच्या शहरात देखील काही मालिकांचे शुटिंग होत असले...तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?
|
1/ 11
पूर्वी मराठी मालिकांचं चित्रीकरण हे फिल्मसिटीमध्ये होताना दिसत होते. मात्र आता मराठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध शहरात होताना दिसते. सध्या झी मराठीवरील नवीन मालिकेचे पुण्याच चित्रीकरण सुरू आहे. तुमच्या शहरात देखील काही मालिकांचे शुटिंग होत असले...तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?
2/ 11
महाराष्ट्रातील सांगली, सातारा, वाई, कोल्हापूर, कोकण, नाशिक या शहरांमध्ये किवां या शहरांच्या जवळच्या खेड्यात मराठी मालिकांचे चित्रीकरण होताना दिसते. मराठी मालिका आणि त्यांच्या चित्रीकरण होणाऱ्या शहराचं नाव याबद्दलच आपण माहिती घेणार आहे.
3/ 11
'झी मराठी' वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पाहायला मिळणार आहे. 'तू तेव्हा तशी' या मालिकेचे सध्या पुण्यात विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे.
4/ 11
स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या रेसमध्ये नंबर वनवर असलेली मालिका मुलगी झाली हो या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील एका गावात सुरू आहे.
5/ 11
कर्लस मराठीवर सर्वांची आवडती मालिका राजा राणीची गं जोडी या मालिकेचे चित्रीकरण सांगलीत होते.
6/ 11
कर्लस मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेचे चित्रीकरण सध्या कोल्हापूरात सुरू आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हार अनेकवेळा कोल्हापूरात स्पॉट झाले आहेत
7/ 11
झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेचे ठाण्यात चित्रीकरण सुरू आहे.
8/ 11
झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेचे चित्रीकरण वाईत होते.
9/ 11
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे चित्रीकरण देखील ठाणे, गोरेगाव या ठिकाणी होताना दिसतं.
10/ 11
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले याचा पहिला व दुसऱ्या सीझने चित्रीकरण कोकणात सुरू आहे.
11/ 11
झी मराठीवरील देवमाणूसचा पहिला सीझन असेल किंवा आताचा दुसरा सीझन याचे चित्रीकरण साताऱ्यात होते.