अभिनेत्री सुरभी हांडे आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुरभी हांडे 'जय मल्हार' या मालिकेतील 'म्हाळसा देवी' या भुमिकेमुळे घराघरात पोहचली होती. या मालिकेने सुरभीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. 2014 मध्ये झी मराठीवर ही मालिका सुरु झाली होती. म्हाळसा देवीच्या रुपात सुरभी हांडेच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं. मात्र सुरुभीची ही पहिलीचं मालिका नव्हती. सुरभी हांडेने वयाच्या सोळाव्या वर्षी मालिका विश्वात पदार्पण केल होतं. सुरभीने सोळाव्या वर्षी 'स्वामी' या मालिकेत उत्तम अभिनय केला होता. त्यांनतर सुरभीने एका हिंदी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. अशा या आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा जन्म 20 मे 1991 मध्ये झाला आहे. सुरभीचा जन्म भंडारा येथे झाला होता. मात्र त्यानंतर तिच बालपण जळगाव येथे गेलं. सुरभीचे 12 वी पर्यंतचे शिक्षण जळगावमध्ये झालं आहे. 12 वी नंतरचे शिक्षण सुरभीने नागपूर मध्ये घेतल आहे. जय मल्हारच्या लोकप्रियतेनंतर सुरभीने 'अग्ग बाई अरेच्चा 2' या चित्रपटात देखील काम केल आहे. अभिनयासोबतचं सुरभीला गाण्याची सुद्धा आवड आहे. सुरभी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.