श्रावण महिना सुरु झाला की सर्व महिला मंडळींना उत्सुकता लागते, ती मंगळागौरची. झिम्मा-फुगडीसारख्या पारंपरिक खेळाने ही मंगळागौर साजरी केली जाते. 'सुख म्हणजे नक्की काय असतं; मालिकेतसुद्धा मंगळागौर साजरी केली जात आहे. सेटवर अगदी उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. मालिकेत सर्व स्त्रिया पारंपरिक रुपात तयार होऊन झिम्मा फुगडीचा आनंद घेत आहेत. सर्वच महिला खूपच सुंदर दिसत आहेत. इतकचं नव्हे तर मालिकेत गौरीसोबत जयदीपसुद्धा फुगडी घालताना दिसून येत आहे. मंगळागौर विशेष्य भागात गौरी पारंपरिक नववारी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.