'पाहिले नं मी तुला' मालिकेतील मनू (मानसी) म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आपल्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना घायाळ करत आहे. तन्वीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अलीकडेचं काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंमध्ये तन्वी अगदी बोल्ड दिसत आहे. तन्वीच्या या फोटोंवर चाहतेही फिदा झाले आहेत. तन्वी फारच कमी वेळा अशा लुकमध्ये पाहायला मिळते. पाहिले नं मी तुला ही तन्वीची पहिलीच मालिका आहे. मात्र पहिल्या मालिकेनेचं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. या मालिकेमध्ये तन्वीने मानसी म्हणजेच मनूची व्यक्तिरेखा साकारली आहे. मालिकेमध्ये मनू खुपचं साधीभोळी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे रियल लाईफमध्ये तिचा हा बोल्ड लुक चाहत्यांसाठी नवाचं आहे. तन्वीच्या निखळ हास्यावर तर अनेक लोक फिदा आहेत.