'फँड्री' या चित्रपटातून चाहत्यांच्या मनाला गारुड घालणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या आपल्या हॉट अंदाजाने चांगलीच चर्चेत आली आहे. राजेश्वरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये राजेश्वरी वेस्टर्न लुकमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'फँड्री' मध्ये अगदी साध्या भोळ्या सोज्वळ रुपात दिसलेली शालू सर्वांना चांगलीच लक्षात आहे. त्यामुळे सोज्वळ शालूला बोल्ड अंदाजात बघून अनेक लोक चकित होतात. मात्र राजेश्वरी रियल लाईफ मध्ये अगदी बोल्ड आणि बिनधास्त आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत आपले फोटो शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. राजेश्वरी सतत आपल्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते चांगली दाद देखील देत असतात. 'फँड्री' चित्रपटाच्या वेळी शालू म्हणजेच राजेश्वरी अवघी नववीला होती. ती सिंहगड युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉम करत होती. राजेश्वरी ही कोणत्याही चित्रपट पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाशी संबंधित नाहीय. ती एक सर्वसामान्य कुटुंबांतील मुलगी आहे. राजेश्वरीचे वडील एका बँकेत नोकरी करतात. राजेश्वरीने 'आयटमगिरी' या चित्रपटात सुद्धा काम केल आहे. राजेश्वरी सध्या चित्रपटांपासून दूर असून आपल्या शिक्षणावर लक्ष देत आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना भुरळ पाडत असते. मात्र राजेश्वरी अजूनही 'शालू' म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.