अभिनेत्री तेजा देवकरने आपल्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. तेजा देवकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती सुपरहॉट दिसत आहे. तेजाने शेयर केलेल्या फोटोंमध्ये तिनं चॉकलेटी रंगाचा वेस्टर्न ड्रेस घातला आहे. या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तेजा अतिशय बोल्ड दिसत आहे. तेजाने हि मराठीतील ओळखीचा चेहरा आहे. तिने २००५ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. तेजाने २००५ मध्ये 'हिरवं कुंकू' हा पहिला मराठी चित्रपट केला होता. हा चित्रपट अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. आणि खासकरून महिला वर्गाच्या. तिने धरपकड, खंडोबाचं लगीन, राधिका, शंभू माझा नवसाचा अशा विविध चित्रपटांत काम केलं आहे.