मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच मात्र त्यांच्या सौंदर्याची भुरळ आजही संपलेली नाही. मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ, सालस अभिनेत्री वयाच्या पन्नाशीत इतकी तरुण आणि तजेलदार दिसतेय हे पाहून अनेकांना त्यांचं अप्रुप वाटतंय. ऐश्वर्या नारकर या त्यांच्या फिटनेसमुळे अनेकांनी इन्स्पिरेशन ठरल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या नारकर यांचं वय पन्नास नाहीये. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केलाय. त्या म्हणाल्या, 'माझी पन्नाशी क्रॉस झालेली नाहीये'. 'सोशल मीडियावर माझी बर्थ डेट चुकीची आहे. त्यामुळे थोडा घोळ होतो'. 'बर्थ डेट चुकीची असली तरी त्याने मला काही फरक पडत नाही'. 'पण माझ्या क्लास मेट्सचं असं म्हणणं असतं ते मला सारखं सांगत असतात, की सांगना की आपलं वय इतकं नाहीये. आपण लहान आहोत अजून'. 'पण ठिक आहे. पंन्नाशीच्या जवळपास मी पोहोचलेच आहे'. ऐश्वर्या नारकर यांनी फिटनेसबाबत बोलताना सांगितलं, 'तुम्ही वयाच्या कुठल्या स्टेजला असा फिटनेस हा आयुष्यात महत्त्वाचा आहे'. 'फिटनेस हा स्वत: प्रसन्न वाटावं, ऐनर्जिटिक वाटावं म्हणून करायचा असतो'. 'फिटनेस हा लाइफस्टाइलचा भाग असला पाहिजे. फक्त यावर्षीपासून करू असं नसलं पाहिजे'. 'मी 15 वर्षांपासून योगा करतेय. पण लोकांसमोर मी हे आता आणायला लागले', असं त्या म्हणाल्या.