Home » photogallery » entertainment » MARATHI ENTERTAINMENT AAI KUTHE KAY KARATE FAME ACTRESS RUPALI BHOSALE LOOKING VERY BEAUTIFUL IN TRADITIONAL NAUVARI SAREE MHAD
'आई कुठे..'फेम संजनाचा मराठमोळा साज; नऊवारीत दिसतेय एकदम झ्याक
रुपालीला मराठी बिग बॉसमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आत्ता ती 'आई कुठे काय करते; या मालिकेतून प्रसिद्धीस आली आहे.
|
1/ 6
'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना अर्थातच अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या नऊवारी लुकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
2/ 6
रुपालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिने मराठमोळा लुक कॅरी केला आहे.
3/ 6
या फोटोंमध्ये रुपालीनं नऊवारी साडी परिधान केली आहे. त्यालाच साजेशी अशी केशरचनासुद्धा केली आहे. तसेच पारंपरिक दागिनेसुद्धा चढवले आहेत.
4/ 6
मालिकेत सतत वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणारी संजना म्हणजेच रुपाली या पारंपरिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
5/ 6
रुपालीला मराठी बिग बॉसमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आत्ता ती 'आई कुठे काय करते; या मालिकेतून प्रसिद्धीस आली आहे.
6/ 6
रुपालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडत आहेत. चाहते लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.