Bigg Boss Marathi: विकासच्या हाती लागला 'अमूल्य मोती'; मात्र गायत्रीने घेतला आक्षेप
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “म्हवऱ्याचा लागलाय नाद” हे साप्ताहिक कॅप्टन्सी कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी कॅप्टन्सीचे दोन उमेदवार मिळणार आहेत.
बिग बॉस मराठीचं घर हे जणू कुस्तीचा आखाडाच बनलं आहे. घरात दररोज नवनवीन टास्क पाहायला मिळतात. नुकताच घरातून स्नेहा वाघ बाहेर पडली आहे.
2/ 7
त्यांनतर लगेचच घरात 'नॉमिनेशन एक्स्रेस' हे नॉमिनेशन कार्य पार पडले. यामध्ये मीरा,दादूस,सोनाली,मीनल आणि विकास हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.
3/ 7
त्यांनतर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “म्हावर्याला लागलाय नाद” हे साप्ताहिक कॅप्टन्सी कार्य सुरु आहे. आणि याच कार्याच्या शेवटी कॅप्टन्सीचे दोन उमेदवार मिळणार आहेत.
4/ 7
उमेदवारी मिळविण्यासाठी सदस्य आतापासूनच जोरदार प्रयत्नात आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज खेळात एक मोठ ट्विस्ट येणार आहे.
5/ 7
आज बिग बॉस सगळ्या सदस्यांना या ट्विस्टबद्दल सांगणार आहेत. आणि त्यावरूनच गायत्री आणि विकासमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे.
6/ 7
बिग बॉस यांनी जाहीर केले, समुद्रातून मासे पकडताना जाळ्यात मोतीही सापडले आहेत. या एका अमूल्य मोतीची किंमत आहे ५० मास्यांएवढी आहे.
7/ 7
टास्क दरम्यान विकास आणि गायत्रीमध्ये यावरूनच वाद होताना बघायला मिळणार आहे. गायत्रीचे म्हणणे आहे, विकास पाटील तुम्ही वरून मोती घेतला आहे... मी तो मोती धरणार नाही मोजताना. त्यामुळे या दोघांच्यात आज नेमकं काय घडतं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.