जय नीथाला समजवताना दिसणार आहे, “रिबिन तर कापायचीच आहे बॉक्सवरची, पण जर आपल्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडे जास्त तर “game is all about संचालक” संचालक ठरवणार approve करायचे की disapprove करायचे. जर आपल्याकडे १० आहेत आणि त्यांच्याकडे १५ बॉक्स आहेत तर आपल्याला त्यांचे ५ आपल्याकडे आणायचे आहेत हा हेतु आहे. त्याच्यामध्ये खेचाखेची होणारं असल्याचं.”
तर जय सांगत आहे, जेव्हा मी (बॉक्स) आणणार ना तेव्हा ते प्रोटेक्ट करण्यासाठी एक माणूस हवा तर दादूस देखील टीमला मदत करणार आहेत रस्सी बांधायला, गायत्री आहेच. कारण मला असं दिसतं आहे शंभर टक्के विकास येणारच. जरी त्याच्याकडे जास्त असतील ना (बॉक्स) तरी तो येणारच. दादूस म्हणाले त्याच्या रक्तातच आहे ते, काहीना काही करायला तो येतोच. उत्कर्ष म्हणाला शंभर टक्के रिबिन कापायला येतील.