अभिज्ञा भावे 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा', 'पवित्र रिश्ता २' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या 'तेजाज्ञा' या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. 'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे.