मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबू तावडे या बहिणी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. या दोघी बहिणींमध्ये फारच घट्ट नातं आहे. सध्या खुशबू आपल्या पहिल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोबतच तितिक्षासुद्धा मावशी असल्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. तितिक्षा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोबतच नुकतंच मावशी बनलेली तितिक्षा आपल्या भाच्यासोबतचे क्युट फोटोही शेअर करत असते. खुशबूने काही महिन्यांपूर्वी गोंडस अशा लेकाला जन्म दिला आहे. खुशबूने 'देवयानी' फेम अभिनेता संग्राम साळवीसोबत लग्न केलं आहे. तितिक्षा बहीण खुशबू आणि भावोजी संग्रामसोबतचे फोटोसुद्धा शेअर करत असते. या दोघी बहिणीमध्ये प्रचंड प्रेम आणि बॉन्डिंग दिसून येतं.