मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अनेक दिवसांनंतर भारतात परतली आहे. मायदेशी परतताच सोनालीने शुटींगलादेखील सुरुवात केली आहे. नुकताच सोनालीने आपला नवा लुक चाहत्यांशी शेयर केला आहे. यामध्ये ती अगदी देसी लुकमध्ये दिसून येत आहे. हे शुटींग जम्मूमध्ये सुरु आहे. सोनालीने आपण पहिल्यांदाच जम्मूमध्ये शूट करत असल्याचंदेखील म्हटलं आहे. सोनालीचा हा देसी अंदाज चाहत्यांना खुपचं भावत आहे. सोनाली लग्न करून दुबईमध्ये होती. तर काही दिवसांपासून ती आफ्रिकेची सफर करत होती. आणि नुकताच ती भारतात परतली आहे.